ओकिनावाद्वारे कामकाजाचा श्रीगणेशा

२५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह उत्पादनास केली सुरूवात

मुंबई : ओकिनावा या ‘मेक इन इंडिया’वर भर असलेल्या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने आज त्यांचे कॉर्पोरेट कार्यालय व उत्पादन केंद्रामध्‍ये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह कामकाजास पुन्हा सुरूवात केल्याची घोषणा केली. सरकारने नियमांमध्ये आणलेल्या शिथिलतेसह ओकिनावाने सांगितले आहे की, ते व्यवसाय कार्यसंचालनांना सुरूवात करत असताना कार्यस्थळ, उत्पादन केंद्र व डिलरशिप नेटवर्क्समध्ये सुरक्षितताविषयक नियमांचे पालन करतील. ब्रॅण्‍डने २५ टक्के कर्मचारी उपस्थितीसह कार्यसंचालन सुरू करणा-या त्यांच्या डिलरशिप नेटवर्कसाठी नियमावली जारी केली आहे. सोबतच उत्पादन केंद्रामधील असेम्ब्लीमधून उत्पादने पाठवण्‍यापूर्वी सॅनिटाईज करण्‍यात येतील आणि डि‍लर भागीदार उत्पादने मिळाल्यानंतर सॅनिटाईज करतील.

ग्राहक व डिलर्सच्या सुरक्षिततेच्या खात्रीसाठी ओकिनावाच्या सर्व डिलरशिप्समध्ये नियमांनुसार योग्य थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तसेच ऑरेंज व ग्रीन विभागांमधील पुन्हा सुरू होणा-या सर्व डिलरशिप्सचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. कॉर्पोरेट कार्यालयामध्ये ओकिनावा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत असल्याच्या खात्री‍साठी कर्मचाऱ्यांच्या आसन व्यवस्थेबाबत खबरदारीचे उपाय घेत आहे. सरकारी नियमांचे पालन करत ब्रॅण्डने कर्मचा-यांना मास्क्स व इतर संरक्षणात्मक उपकरणांचा पुरवठा करण्यासोबत आरोग्य सेतू मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड करणे अनिवार्य केले आहे.

ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक जीतेंदर शर्मा यांनी सांगितले की, ‘संपूर्ण देशासाठी या दुर्दैवी स्थितीमध्ये ओकिनावा एक जबाबदार ब्रॅण्ड म्हणून आपले कर्मचारी, डिलर भागीदार व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संभाव्य उपाय हाती घेत आहे. सरकारसोबत आपण सहयोगाने काम करत या आव्हानात्मक स्थितीवर मात करण्याची गरज आहे. सरकारने आर्थिक व्यवहारांवर शिथिलतेची घोषणा केली असताना आम्ही सर्व खबरदारी घेत हळूहळू व्यवसाय कार्यसंचालन पुन्हा सुरू करण्याचे ठरवले आहे.

 383 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.