कोरोनाविरोधातील लढाईला आयुष काढ्याची साथ

रा.स्‍व. संघ जनकल्‍याण स‍मिती व आयुर्वेद व्‍यासपीठाचा संयुक्‍त उपक्रम

ठाणे : कोरोना विरोधातील लढाईत सर्वशक्‍तीनिशी उतरलेल्‍या रा.स्‍व. जनकल्‍याण समितीने विविध उपक्रम सुरू केले आहेत. कम्‍युनिटी किचन, फीवर क्‍लीनिकच्‍या माध्‍यमातुन रूग्‍ण तपासणी, हॉटस्‍पॉट भागातील नागरिकांचे सर्वेक्षण व त्‍यांना पुढील उपचारासाठी महानगरपालिकेच्‍या आरोग्‍य यंत्रणेशी जोडून देणे आदीच्‍या माध्‍यमातुन सुरू असलेल्‍या करोना विरोधातील उपाययोजनेत आता आयुष काढ्याची साद ठाणेकरांना मिळणार आहे. रा.स्‍व. संघ जनकल्‍याण स‍मिती व आयुर्वेद व्‍यासपीठ आता कोरोना उपाययोजनेत कार्यरत कार्यकर्ते, पोलिस यंत्रणा, पालिका आरोग्‍य कर्मचारी तसेच हॉटस्‍पॉट भागातील रहिवाशी यांच्‍या प्रतिकारशक्‍ती वृंदिगत व्‍हावी म्‍हणून आयुष काढ्याचे वाटप करणार आहे. भगवान बुध्‍द पोर्णिमेच्‍या मुहुर्तावर या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला आहे.

भारत सरकारच्‍या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्‍यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे नागरिकांनी सेवन करावे असे आवाहन केले आहे. या काढ्यामुळे नागरिकांच्‍या प्रतिकारशक्‍ती वाढ होतेच त्‍याचबरोबर हा काढा घेतल्‍याने संशयित रूग्‍णात देखील झपाटयाने सुधारणा होत असल्‍याचे निष्‍कर्ष समोर आले आहेत. आयुष काढ्यात सुंठ, दालचिनी, मरीच, तुलस, हरिड्रा, अमालकी, बिभीटाकी, गुळवेळ,यष्‍टीमधु यांचे संतुलित प्रमाण वापरले गेले आहे. हा काढा आता भरड आणि गोळी स्‍वरूपात देखील उपलब्‍ध झाला आहे.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या कोरोना आपत्ती प्रतिबंधन समितीचे सदस्य व आयुर्वेद व्यासपीठाचे प्रवर्तक वैद्य विनय वेलणकर यांच्‍या संकल्‍पनेतुन या गोळ्या व काढा भरड तयार करण्‍यात आली आहे. बुध्‍द पोर्णिमेच्‍या मुहुर्तावर आयुर्वेद व्यासपीठाच्या वैद्या रूपाली जोशी व रा स्व संघ जनकल्याण समितीचे ठाणे जिल्हा कार्यवाह संतोष धुमक यांच्‍या प्रयत्‍नाने काढ्याचा पहिला हप्‍ता ठाण्‍यात दाखल झाला आहे.

एका व्‍यक्‍तीने वीस दिवस हा काढा घ्‍यायचा आहे. काढ्याचे एक पाकीट एका व्‍यक्‍तीसाठी १० दिवस पुरते. त्‍या पाकिटाची किंमत रूपये १० इतकी आहे. ज्‍यांना हा काढा हवा असेल त्‍यांनी अशोक सोनटक्‍के ९९६९१३७६४८ व श्रीराम पाठक यांना ९८९२७९८५१९ या क्रमांकावर केवळ व्‍हाट्सअप मेसेज पाठवावा असे आवाहन रा.स्‍व. संघ जनकल्‍याण स‍मिती व आयुर्वेद व्‍यासपीठ यांच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

 541 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.