ट्रक चालक व मालकांसाठी व्हील्सआयचे ऑनलाईन सहाय्यता केंद्र

पोर्टलद्वारे ट्रकचालकांना महत्त्वाच्या बातम्या तसेच ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीसंबंधी धोरणात्मक घोषणांची माहिती देणार

मुंबई : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ट्रक मालकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित असलेल्या व्हील्सआय या हायपर ग्रोथ स्टार्सअपने ‘ट्रक मालिक सहाय्यता केंद्र’ या ऑनलाईन पोर्टलची सुरुवात केली आहे. या पोर्टलद्वारे ट्रकचालकांना महत्त्वाच्या बातम्या तसेच ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीसंबंधी धोरणात्मक घोषणांची माहिती देण्याचा कंपनीचा हेतू आहे. या क्षेत्रातील लोकांना येणाऱ्या ईएमआयविषयक अडचणी, अन्न व निवा-याच्या समस्या, अफवांवर आळा घालणे, उद्योगपूरक धोरणांबद्दल जागरुकता निर्माण करणे यासारख्या अडचणी सोडवून या उद्योगाला आधार देणे, ही यामागील संकल्पना आहे.

महामार्गांवर अडकलेल्या ट्रक मालक आणि चालकांना ऑनलाइन पोर्टलवरून भारतभरातील जवळपासच्या शासकीय अधिकृत व खाजगी अन्न व निवारा केंद्रांचाही शोध घेता येईल. ब्रँडने देशभरातील २ हजारांपेक्षा जास्त केंद्रांवर ट्रक चालकांना अन्न व निवासाची व्यवस्था पुरवली आहे. अनिवार्य लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिकृत जवळचे मेंटेनन्स वर्कशॉप व दुरूस्ती केंद्रही या पोर्टलवरून शोधता येईल.

व्हील्सआयमधील मुख्य टीम सदस्य व या उपक्रमाचे प्रमुख सोनेश जैन म्हणाले, ‘सध्याच्या साथीच्या आजाराचा सर्वाधिक फटका बसलेल्यांपैकी एक असलेल्या ट्रक मालक व चालकांना मदत करण्याच्या हेतूने हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. देशातील वाहतूक प्रणालीची पुनर्बांधणी करण्यात अग्रेसर असलेला लॉजिस्टिक ब्रँड या नात्याने व्हील्स आय ऑनलाइन सपोर्ट देऊन येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.’

 381 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.