महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा
परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना व श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या वतीने ५ ते १३ मे दरम्यान ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज खो-खो तील सुरुवातीचा व नंतरचा व्यायाम प्रकार याविषयी परभणी येथील प्रवीण चाळक यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात दररोज वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन होत असून ते सर्वांनाच मार्गदर्शक ठरत आहे. काल या शिबिरात खो -खो खेळाचे अध्यावत नियम व क्रीडांगणाची मापे याविषयी मुंबई उपनगरच्या डॉ. नरेंद्र कुंदर यांनी मरदर्शन केले तर आज परभणी येथील प्रवीण चाळक यांनी खो-खो तील सुरुवातीचा व नंतरचा व्यायाम प्रकार याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या खेळात असलेले विलक्षण चापल्य, वेगवान निर्णय, साहसी झेप किंवा अप्रतिमरीत्या स्तंभात मारणे, खेळाडूंच्या हुलकावण्या यामुळे ७ किंवा ९ मि. व त्याचबरोबर संपूर्ण सामना नेहमीच रोमहर्षक ठरत असतो. खो खोतील हे चापल्य व केले जाणारे इतर व्यायाम मात्र खेळाडूंना आयुष्यभर तंदुरुस्त ठेवतात. अतिशय वेगवान, क्षणाक्षणाला उत्कंठा व निर्णय क्षमता वाढवणारा हा खेळ प्रेक्षकांना नेहमीच मैदानावर खिळून ठेवतो. खो-खो हा वेगवान, साहसी खेळ असल्याने त्यात खेळाडूंच्या दुखापती सुद्धा खूप आहेत. त्यांची योग्य व वेळेत काळजी घेतली नाही तर आपल्या शरीराची दुखापत बळावण्याची शक्यताच जास्त असते.
खो-खो खेळाचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूने नियमित सारावाबरोबर सरावाआधी बॉडी वॉर्मअप व सारावानंतर बॉडी कंडीशनिंग करणे फारच महत्वाचे आहे. कोणताही खेळ असो शरीर लवचिक असणे फारच महत्वाचे आहे. जर आपण सराव करत असू किंवा प्रत्यक्ष सामना खेळत असू तरी बॉडी वॉर्मअपला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या डोक्यापासून पायाच्या अंगठ्या पर्यंत प्रशिक्षकाने दिलेले वेगवेगळे व्यायाम प्रकार करून खेळाडूने आपले शारीरिक तापमान वाढवले पाहिजे व त्याचबरोबर सराव किंवा सामना संपल्यावरसुद्धा प्रशिक्षकाने दिलेले वेगवेगळे व्यायाम प्रकार करून बॉडी कंडीशनिंग म्हणजे शारीरिक तापमान कमी केले पाहिजे , शरीर थंड केले पाहिजे.
शारीरिक तापमान वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार असतात. त्यात स्ट्रेचिंग, हळू धावणे (जॉगिंग करणे), शॉर्ट स्प्रिंट, लॉंग स्प्रिंट मारणे फारच योग्य ठरते. त्याचबरोबर वेगवेगळे व्यायाम प्रकार म्हणजेच मानेचा, हातांचा, कंबरेचा, गुडघ्याचा, घोट्याचा असे विविध प्रकारचे व्यायाम प्रकार प्रशिक्षक करून घेत असतात व त्यामुळेच आपले शारीरिक तापन योग्य झाल्याने खेळात आपण प्रचंड वेगवानता, लवचिकता व चापल्य दाखवू शकतो. सामना , सराव संपल्यावर सुद्धा लगेच पॅकअप न करता बॉडी कंडीशनिंग करणे फारच म्हत्वाचे आहे. याचा अर्थ लगेच थंड पाण्याने अंघोळ करावी किंवा एसीत बसावे असे नाही. तर आपण प्रशिक्षकाने दिलेले वेगवेगळे व्यायाम प्रकार करून आपले शरीर थंड केले पाहिजे. त्यावेळी आपल्या शिरा हळू हळू ताणल्या जाण्याचा व शरीर लवचिक व थंड करण्याचा व्यायाम आपण करणे म्हत्वाचे आहे. जर शरीराला तापण व शीतल करण्याचा नीट व्यायाम केला नाही तर मात्र आपल्या शरीराची हानी मात्र नक्कीच ठरलेली असेल हे समजा.
ही ऑनलाइन कार्यशाळा अतिशय उत्तम रित्या पार पडावी यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, संस्थेचे डॉ. सुनील मोडक, सुशील इंगोले व पवन पाटील आदि झटत आहेत.
705 total views, 1 views today