राज्यात उकाडा वाढणार : बहुतांश जिल्ह्यात ४० पार तापमान


काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : राज्यात एकाबाजूला कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता तापमानाचा कहरही सुरु झाला आहे. बहुतांष जिल्ह्यात दिवसभरात ४० पार वातावरण गेले असून काही दिवस असाच उखाडा राहणार असल्याचे हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांनी सांगितले.
बारामती ४०, ठाणे ४०, उस्मानाबाद ४२, औरंगाबाद ४१, सांगली ४१, जेऊर ४२, मालेगांव ४४, अकोला ४४, अमरावती ४२, गडचिरोली ४०, नागपूर ४२, वाशिम ४२, सोलापूर ४३, जळगांव ४३, पुणे ४०, नांदेड ४३, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४२, चंद्रपूर ४४, गोंदिया ४०, वर्धा ४२, यवतमाळ ४३ वर तापमान पोहोचले. त्यामुळे या भागात उखाड्याने नागरिक हैराण झाले.
मुंबईतील कुलाबा भागात वातावरण ३४ वर सांताक्रुज येथे ३४ वर तापमान पोहोचल्याने मुंबई आणि उपनगरातील नागरिक उखाड्याने हैराण झाले.

 510 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.