रिक्षा चालकांना केले अन्नधान्याचे वाटप
कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सर्व काही बंद आहे. यातच रिक्षा चालकांचे पण हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजसेवक सचिन शिरसाट यांनी रिक्षा चालकांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप केले. या वेळी बाजारपेठ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण उपस्थित होते. या मदतकार्यात संगीता साळवे, लक्ष्मी शिरसाट, हौसा शिरसाट, उर्विता शिरसाट, मयुरी शिरसाट, स्पृहा म्हात्रे, शिमांशु शिरसाट, कैलास पाटील आदींनी सहकार्य केले.
569 total views, 1 views today