राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कालिदास देशमुख यांनी राबवला उपक्रम
बदलापूर : जगभरात कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे. दोन लाखापेक्षा जास्त बळी घेतलेत. आता भारत सरकारने लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला आहे. बदलापूर मध्ये कोरोना रुग्णाची संख्या ३२ झाली असून रेड झोन लागू झाला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे कंत्राटी कामगार आपला जीव धोक्यात घालून शहर साफ ठेवण्याचे काम करतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कालिदास देशमुख यांनी अत्यावश्यक सेवा देणारे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेत सॅनिटायझर, मास्क व जीवनाश्यक वस्तू मोफत देऊन दिलासा दिला आहे. आता पर्यन्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव कालिदास देशमुख यांनी अनेकांना मदत केली असून लॉकडाऊन आहे तो पर्यंत अशा अनेकजण व गरजू असतील त्यांनीं संपर्क केल्यास नक्कीच मदत करू असे आश्वासन कालिदास देशमुख यांनी दिले आहे.
438 total views, 2 views today