राष्ट्रवादी काँग्रेस च्या मागणीला यश


राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख ह्यांनी मानले सरकारचे आभार
बदलापूर : सर्व सरकारी नोकर वर्गाची व्यवस्था मुंबईतच केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. हि मागणी शासनाने मान्य केली आहे. त्या बद्दल राष्ट्रवादी कँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
बदलापूर सारख्या जवळपास ३ लाख लोकसंख्या असणाऱ्या छोट्या शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बदलापूर शहरातील जवळपास ३ हजार सरकारी नोकर वर्ग, विविध भागात कर्तव्य बजावण्यासाठी मुंबई शहरातील विविध भागात दररोज जात असतो. बदलापूर रेल्वे स्टेशन जवळील बस डेपोच्या आवारात दिवसाला अंदाजे २५० बसेस मुंबई ते बदलापूर ये जा करतात. ह्या सर्व बसेसमधून सरकारी कर्मचारी ये जा करीत असतात.
बदलापूर शहरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन त्या मध्ये मुंबई वरून बदलापूर शहरात परत घरी येण्याच्या नोकर वर्गाला कोरोना ची लागण जास्त प्रमाणात आहे. ह्याचा पादुर्भाव आणखी होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख ह्यानी मागणी केली होती की ह्या सर्व सरकारी नोकर वर्गाची व्यवस्थाही मुंबईतच केली पाहिजे. ह्या साठी त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांना ही गंभीर बाब शहराच्या दृष्टीने सांगितली होती. सरकारने कालिदास देशमुख ह्यांची मागणी मान्य करत ह्या नोकर वर्गाची व्यवस्था मुंबईत करण्यात येईल असे जाहीर केलं आहे. मागणी मान्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सरकारचे कालिदास देशमुख यांनी खास आभार मानले आहेत.

 468 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.