महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण
मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्य पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महानगरपालीकेचे आयुक्त प्रवीण परदेशी साहेब यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सींद्वारे १ मी रोजी कोविड-१९ कोरोना विषाणूची स्वाब व मोबाईल एक्स रे चाचणी करणारी अत्याधुनिक आणि वातानुकूलित फिरत्या बसचे उदघाटन नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया, वरळी, मुंबई येथे करण्यात आले.
या बसमध्ये अत्याधुनिक तांत्रिक कोरोना एक्स रे ची सुविधा करण्यात आली आहे. अगोदर संशयीत रुग्णाचे छातीचे एक्स रे घेण्यात येतो त्यात लक्षण आढळ्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड-१९ स्वाब चाचणी (घशातील नमुने) केली जाते. बसमध्ये स्वतंत्र कक्षासह, मोबाईल एक्स रे ची सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हि चाचणी प्रशिक्षित आणि एक्स्पर्ट डॉक्टरांकडून केली जाणार आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रचंड वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बी.एम.सीचे आयुक्त परदेशी यांच्या संकल्पनेतून क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रा. लि. पुणे, आणि आय.आय.टी. एल्युमनाय कौन्सिल इंडिया या संस्थेंकडून सीएसआर फंडातून कोरोना चाचणीसाठी अत्याधुनिक तांत्रिक अशी सुसज्ज बस तयार करण्यात आली आहे.
या ऑनलाईन उदघाटन प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद उघाडे, डॉ. मुफझल लकडावाला, क्रस्ना डायग्नॉस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, मेडिकल विभागाचे संचालक डॉ. किरणकुमार भिसे, पॅथॉलॉजिचे उपाध्यक्ष डॉ. राजीव राव आदी सहकारी उपस्थित होते
513 total views, 1 views today