करोनाचा वाढता फैलाव पाहून नागरिकांना घरातच थांबण्याचे केले आवाहन
ठाणे : करोनाच्या फैलाव मुंबई, पुणे यांच्या सह आता ठाण्यातही वाढू लागलाय रोज किमान २० करोना बाधित रुग्न ठाणे महानगर पालिका हद्दीत समोर येवू लागलेत यामुळे पोलिस प्रशासनाने लाॅंग मार्च काढत ठाणेकरांना पुन्हा एकदा कळकळीचे आवाहन केलय “घरात रहा, सुरक्षित रहा” असे हे आवाहन करण्यात आलय… नौपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा लाॅंग मार्च काढला गेला असून नौपाडा हद्दीत अशी काही ठिकाण आहेत जिथे लोकं सर्रास रस्त्यावर येत होती त्या ठिकाणी तसच गल्ली बोळातून देखील हा लाॅंग मार्च काढण्यात आलाय… जर नियमांचा भंग केला आणि विनाकारण घरा बाहेर पडलात तर थेट जेलची हवा खाली लागेल लाॅक डाऊनचे नियम आता आणखी कठोर करण्यात आलेत त्यामुळे लोकांनी घरीच रहावे असं आवाहन यावेळेस पोलिसांनी केलय…
577 total views, 2 views today