जिल्हयात ८२१ स्वच्छताग्रहींचे कोविड १९ संबधी ऑनलाईन घेतले प्रशिक्षण

ठाणे जिल्हा परिषदेने केले होते आयोजन

ठाणे : जिल्हा पाणी स्वच्छता कक्ष जिल्हा परिषद ठाणेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या आदेशानुसार जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतस्तरावर उपलब्ध ८२१ स्वच्छाग्रहींना कोविड १९ या संसर्गजन्य आजाराबाबत मार्गदर्शन करण्याबाबतचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले.

यावेळी छायादेवी शिसोदे (उपमुख्य कार्यकारी आधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ) यांनी आपल्या प्रास्ताविक मार्गदशनमध्ये कोविड १९ हा आजाराबाबत माहिती दिली व स्वच्छाग्रहींसाठी हे प्रशिक्षण किती अत्यावश्यक आहे याबाबत स्वच्छाग्रहींना कल्पना दिली. तर जयंत देशपांडे ( राज्य समन्वयक युनिसेफ ) यांनी कोविड १९ संबधी राज्यस्तरीय कार्यवाही यांबाबत मार्गददर्शन केले.

चंद्रकांत कचरे ( विभागीय सल्लागार पाणी व स्वच्छता सहाय्य्‍ संस्था बेलापुर )यांनी कोविड १९ संदर्भात कोविड संसर्ग नियंत्रणात स्वच्छाग्रहींची भुमिका याबाबत मार्गदर्शन केले. डॉ नागरे (वैदयकिय अधिकारी) यांनी कोविड १९ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत असतांना कोविड विषाणुचा प्रसार कशाप्रकारे झाला यांची माहिती दिली. अनिल निचीते ( जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक) यांनी या काळात कशाप्रकारे काळजी घ्यावी घेण्यात यावी हे सांगताना सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, सांबणाने हात धुवणे,सॅनिटायझरचा वापर करणे, सार्वजनिक कार्यकम टाळावेत आदी गोष्टी सांगितल्या.

सारीका देशमुख्य यांनी सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा घेता येतील याबाबत स्वच्छग्रहीना मार्गदर्शन केले. प्रमिला सोनवणे यांनी कोविड १९ बाबत जनजागृती करत असतांना कोविड संभाव्य आणि बांधित व्यक्ती संबंधी काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर चंदे , दत्तात्रय सोळंके यांनी देखील मार्गदर्शन केले . प्रशिक्षणाचे समारोप सुधाकर जाधव (लेखाधिकारी )यांनी केले

 630 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.