ठाणे जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग आणि रिलायन्स फाउंडेशनचा पुढाकार
ठाणे : महिला व बाल विकास विभाग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या वतीने मुरबाडच्या सहाशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने स्तनदा माता, गरोदर माता आणि बालकं असणाऱ्या कुटुंबाचा समावेश आहे. ठाणे जिल्हा परिषदे अध्यक्ष दिपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, महिला व बाल कल्याण सभापती सपना भोईर, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाच्या काळात संचारबंदी लागू करण्यात आलेली असल्याने वीटभट्टीवर काम करणारे मजुरांचे कुटुंब, रोजनदारीवर काम करणारे आदिवासी कुटुंबांचे कोणत्या प्रकारे जेवणाचे हाल होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी महिला व बाल विकास विभागाला दिल्या होत्या. या विभागाचे महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सुयोग्य नियोजन करत विविध संस्थांचे सहकार्य घेत मुरबाड, शहापूर भागात स्तनदा, गरोदर व बालकं ज्या कुटुंबात आहेत अशा कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करत आहेत. नुकतेच रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून मुरबाडच्या सहाशे कुटुंबाना आटा, तांदूळ, डाळ, साखर, मसाला, तेल, मसाल्याचे पदार्थ, आदी वस्तूंचे वाटप केले.
या पूर्वी देखील जिंदाल कडून ९५०, लायन्स क्लब जुहू १००, रोटरी क्लब १७० कुटुंबांना आदी संस्थांच्या सी.एस.आर.च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मोठी मदत झाल्याचे भोसले यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात लोकांना शासकीय मदत मिळत आहेच.शिवाय सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अनेक संस्था पुढे येत आहेत.या काळात स्तनदा,गरोदर माता आणि बालक यांना पूरक पोषण मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी महिला व व बाल विकास विभागाच्या माध्यमातून काम सुरू ठाणे जिल्हा परिषदेचें मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे म्हणाले.
518 total views, 1 views today