प्रवीण आणि कल्याणी या नवंदाम्पत्याने पंतप्रधान निधीला दिला १०००० रुपयांचा धनादेश
बदलापूर : मुरबाड मतदार संघातील फळेगाव येथील प्रविण आत्माराम ढोले व कल्याणी प्रविण ढोले, या नवविवाहित दाम्पत्यांनी १०००० रुपये इतक्या रकमेचा धनादेश, पंतप्रधान सहाय्यता निधी (covid-19) करिता मुरबाडचे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत फळेगाव येथील नुकतेच लग्न झालेल्या प्रविण आत्माराम ढोले व कल्याणी प्रविण ढोले या नवीन दाम्पत्यांने १००००/- रुपयांचा धनादेश, पंतप्रधान सहाय्यता निधी (covid-19) करिता, भाजपा आमदार किसन कथोरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
नवीन लग्न झालेल्या या दाम्पत्याचा आदर्श सर्वांनी घेत अशीच साथ सरकारला मिळत राहो अशी प्रतिक्रिया आमदार किसन काथोरे यांनी व्यक्त केली आहे. या नवीन दाम्पत्यांचे त्यांनी खूप खूप अभिनंदन केले व भावी आयुष्या साठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.
702 total views, 3 views today