२१ महिलांनी ओवाळून दिली अंबरनाथ पोलिसांना मानवंदना

संचार बंदी मध्ये नागरिकांनी सहकार्य करावे : मनजितसिंग बग्गा

अंबरनाथमध्ये पोलिसांचा रूटमार्च


अंबरनाथ : कोरोनाशी आपण सर्व जण एकत्र येऊन लढा देत आहोत. आता पर्यंत आपण सर्व नागरिकांनी सहकार्य केले तसेच किंबहुना याही पेक्षा जास्त सहकार्य येत्या संचार बंदीच्या काळात करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी केले.
कोरोनाच्या लढाईत पोलीस रात्रंदिवस सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर पहारा देतायत. याच पोलिसांप्रती अंबरनाथकरांनी अनोख्या पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस खात्यात जशी २१ तोफांची सलामी दिलली जाते त्या प्रमाणेच २१ महिलांनी पोलिसांना ओवाळून मानवंदना दिली. अंबरनाथच्या वडवली, हेरंब विभाग या परिसरात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या महिला व पुरुष पोलिसांनी रूट मार्च केला. यावेळी नागरिकांनी पोलिसांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे आभार मानले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजीत सिंग बग्गा यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत, असा संदेश देत यावेळी नागरिकांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या रूट मार्चच्या समारोप प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी वरील आवाहन केले. कोरोनाची हि लढाई अशी एक वेगळी लढाई आहे, कि ज्यात आपण सर्व नागरिकांनी आपापल्या घरातच थांबायचे आहे. त्यामुळे आपण कोरोनाला सहज हरवू शकतो. म्हणूनच आम्ही शासनाच्या वतीने कळकळीचे आवाहन करतो कि आपण अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घरा बाहेर पडू नका. आम्ही आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आमच्या घराबाहेर आहोत. गंभीर वातावरण हलके करताना मनजितसिंग बग्गा म्हणाले आम्हाला कोणी सांगत नाही कि घरी बसून रहा आम्हा पोलिसांना कोणी सांगितले तर आम्ही वर्षभर घरात बसून राहू. त्यांच्या या विनोदावर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज पर्यंत आपल्या शहरात कोरोनाचे जास्त रुग्ण नाहीत याचा अर्थ असा नव्हे कि आपण आता घराबाईहर पडायला हरकत नाही तर तसे अजिबात नाही या उपलट येणारे काही दिवस आपल्या कसोटीचे असल्याने आपण सर्वानी घरातच थांबून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी केले.
या वेळी स्थानिक नगरसेविका वीणा उगले, शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले, स्वच्छता दूत विजय लेले,श्रीधर जोगळेकर, सुहास सावंत, कमलेश कोशे, किशोर सावंत, विजय देवरुखकर, प्रमोद कुलकर्णी, गिरीश हेब्बळी आदी मान्यवर उपस्थित होते. पुरुषोत्तम उगले यांनी प्रास्तविक तर सुरेख कुलकर्णी यांनी आभार मानले.
वडवली वेल्फेअर सेंटर येथून हा रूट मार्च सुरु झाला. प्रजापिता ब्रह्माकुमारी मंडळातर्फे सर्व पोलिसांचे टाळ्या वाजवून, पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. हेरंब विभागातून जागृत गल्ली मार्गे वडवली येथील जयहिंद बँके जवळ या रूट मार्चचा समारोप करण्यात आला.

 539 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.