अंबरनाथमध्ये “मोबाईल फिवर क्लिनिक” सुरु

नागरिकांनी लाभ घेण्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे आवाहन


अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद, इंदोर कॉम्पोझिट्स प्रा.लि. व ऍडीशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन (आमा) यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरातील प्रभाग निहाय नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याकरिता ” मोबाईल फिवर क्लिनिक ” ची सुरुवात करण्यात आली आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील जावसई, फुले नगर येथे या आरोग्य तपासणीचा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केले आहे.
जावसई येथे औपचारिक उदघाटन करण्यात आले. सुरक्षित अंतर राखून हा उदघाटन सोहळा पार पडला. या मोबाईल फिवर क्लिनिक मध्ये एक डॉकटर आणि एक परिचारिका सेवेत असून प्रत्येक प्रभागात हि सेवा देण्यात येणार आहे. प्रभागत आल्यावर जास्तीत जास्त नागरिकांनी या फिवर क्लिनिकच्या माध्यमातून आपली तपासणी करून घ्यावी. हि सेवा विनामूल्य असल्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितले. या मोबाईल फिवर क्लिनिकची अंबरनाथ आनंद नगर औद्योगिक वसाहतीमधील इंदोर कॉम्पोझिट प्रा. लिमिटेड या कंपनीने सर्व जबाबदारी उचलली असल्याचेही आमदार किणीकर यांनी सांगितले. या कंपनीने या आधी मुख्यमंत्री सहायता निधी साठीही भरघोस मदत दिल्याबद्दल आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कम्पनीचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश संघवी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
डॉ. गोविंद गिरासे हे रुग्णांची तपासणी करणार असून त्यांना अस्मिता रंगारी या सहकार्य करणार आहेत. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत मोबाईल फिवर क्लिनिक फिरणार आहे. प्रत्येक दिवशी चार प्रभागात जाऊन नागरिकांची तपासणी करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली. हे क्लिनिक आपल्या प्रभागात आल्यावर नागरिकांनी संकोच न करता थोडी जरी प्रकृती विषयी शंका किंवा ताप, सर्दी आहे असे वाटल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहनही मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले आहे. या पूर्वी पालिकेने शहरातील वैधकीय अधिकार्यांच्या सहाय्याने तीन फिवर क्लिनिक सुरु केले आहे. आता मोबाईल फिवर क्लिनिक सुरु केले आहे असेही पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, इंदोर कॉम्पोझिट्स प्रा.लि.कंपनीचे मालक मुकेश संघवी, मुख्याधिकारी देविदास पवार, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण, आमाचे अध्यक्ष उमेश तायडे, माजी नगरसेवक रवी करंजुले, नियोजन सभापती अनंत कांबळे, नगरसेविका वंदना पाटील, नोडल अधिकारी मेजर डॉ. नितीन राठोड, आमाचे परेश शहा, विजयन नायर, आरोग्य अधिकारी सुरेश पाटील, कंपनीचे संचालक रोनक संघवी, व्यवस्थापक संजय तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 365 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.