कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मुंबईच्या महापौर झाल्या पुन्हा नर्स

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना पुन्हा रुग्णसेवा करण्याचा घेतला निर्णय

मुंबई  : मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. या कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील वैद्यकीय सेवेतील प्रत्येकाला आवाहन केले होते. त्या आवाहनाला साद देत राज्यभरातून अनेकांनी हे सेवाव्रत अंगीकारले आहे. आता यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणोकर या देखील मागे राहिल्या नसून त्यांना देखील कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुन्हा नर्स बनून सेवेत रुजु होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्या आता मुंबईतील रुग्णालयात हजर झाल्या आहेत. असा प्रत्येकानेच या लढाईत सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

किशोरी पेडणेकर यांचा जन्म १९६२ चा आहे शिवसेना या पक्षातून त्या दक्षिण मुंबईतील लोअर परळमधून ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत

गिरणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या पेडणेकर यांनी १९९२ मध्ये शिवसेनेच्या महिला शाखेत जाण्यापूर्वी परिचारिका म्हणून काम सुरु केले होते आणि त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरीसाठी पाठवले होते.

पेडणेकर २००२ मध्ये मुंबईत नगरसेवक झाले आणि २०१२ आणि २०१८ मध्ये ते पुन्हा निवडून आले. पेडणेकर यांनी आपल्या तीन कार्यकाळात बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मध्ये महत्त्वपूर्ण पदावर काम केले आहे. या समितीने नागरी एजन्सीच्या आर्थिक तपासणीसाठी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले. पेडणेकर यांनी परिचरिकेचे काम केले असल्याने महाराष्ट्रात मुंबई मध्ये आलेल्या कोविड १९ या साथीच्या आजारात नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा परिचारिका म्हणून नायर हॉस्पिटल मध्ये काम सुरू केले आहे

 564 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.