बिहार फाऊंडेशनतर्फे गरजूंना अन्नदान

वांगणी ते कल्याण परिसरातील कामगार, कष्टकरी वर्गाला दररोज दुपार आणि संध्याकाळी जेवणाची पाकिटे

अंबरनाथ : करोना संकट काळात गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत आहेत. ठिकठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करून लोकांपर्यंत जेवणाची पाकिटे पोहोचती करीत आहेत. कल्याण परिसरात कार्यरत असलेल्या बिहार फाऊंडेशनच्या वतीने वांगणी ते कल्याण परिसरातील कामगार, कष्टकरी वर्गाला दररोज दुपार आणि संध्याकाळी जेवणाची पाकिटे दिली जात आहेत. अंबरनाथ येथील स्वामी समर्थ चौकात असलेल्या कर्णिक कॅटरिंग सव्र्हीसेसच्या स्वयंपाकघरात अन्न शिजवले जाते. तिथेच ते पॅकिंग करून गरजूंना पोहोचविले जाते. सध्या दुपारी आणि संध्याकाळी प्रत्येकी १३०० अन्नाची पाकिटे गरजूंपर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती फाऊंडेशनचे नरेंद्रसिंग यांनी दिली. या अन्नदानाबरोबरच सध्या पवित्र रमझान महिन्याचे रोझे सुरू असल्याने परिसरातील ३०० गरजू मुस्लिम बांधवांना रोज फळांची पाकिटेही वितरीत केली जात आहेत. मोरया फाऊंडेशनचे वैभव ठाकरे, रवि ठाकरे आदी तरुण स्वयंसेवक या कार्यात मदत करीत आहेत.

 605 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.