१९ एप्रिलपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू
बदलापूर : शहरामध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण नवी मुंबई येथील एका फार्मा कंपनीत काम करतो. कामाच्या ठिकाणी एक व्यक्ती ३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आढळल्याने , त्याच्या संपर्कात आल्यामुळे टेस्ट करण्यात आली. ह्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी १५ एप्रिल पासून अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. १८ एप्रिल रोजी ह्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला व १९ एप्रिल रोजी त्यांना वेदांत हॉस्पिटल ठाणे येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती बदलापूर चे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे.ही व्यक्ती कामासाठी बदलापूरहून त्यांच्या ऑफिस च्या गाडी ने एक दिवसा आड जात होती. जाताना सुरक्षित अंतर ठेवण्यात येत होते. ह्या व्यक्तीच्या घरातील दोन सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे. तसेच कोरोना बाधित व्यक्ती ज्या बसने बदलापूर वरून त्यांचे ३ सहकारी ऑफिस जात होते, त्यांची ही टेस्ट करण्यात आली, त्या तिघांची टेस्ट देखील निगेटिव्ह आली आहे असेही त्यांनी सांगितले.
674 total views, 2 views today