विजेच्या लपंडावामुळे नागरीकांचा प्रक्षोभ

संपूर्ण कळवा, विटावा, खारीगाव, पारसिकनगर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याबाबत टोरेंट कंपनीच्या मुख्याधिकाऱ्यांस जाब विचारत नागरिकांच्या समस्यांची करून दिली जाण

ठाणे : सद्यस्थितीत कोरोना वैश्विक महामारीबाबतची परिस्थिती आपण सर्वजणं जाणत आहोत. एका बाजूला सर्व सरकारी यंत्रणा नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करित असताना सदर परिसरातून नागरिक बंधू भगिनी दिवसभरात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याबाबत तक्रारी करत आहेत. अर्थातच एप्रिल महिन्याच्या दाहक उन्हात सर्व नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कोरोना विषाणू संकटासोबतच याही समस्येला सामोरे जावे लागत आहे. याव्यतिरिक्त जेव्हा नागरिक टोरेंटच्या बिलावर असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करतात, तेव्हा त्यांना बऱ्याचवेळा समोरुन प्रतिसादही मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप होत आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गंभीर बाब टोरेंट प्रशासनाच्या निदर्शनास आणून संपूर्ण कळवा, खारीगाव, पारसिक नगर, विटावा परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येचा उहापोह केला. याबाबत टोरेंट प्रशासन व्यक्तिशः लक्ष देऊन संपूर्ण कळवा ते पारसिक नगर वासियांची समस्या सोडवेलंच हा विश्वास दर्शवत टोरेंट कंपनीच्या वतीने नागरिकांना अतिरिक्त हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले जावे व त्यातून नागरिकांना योग्य प्रतिसाद मिळावा ही मागणी निवेदनाद्वारे याप्रसंगी व्यक्त केली. याप्रसंगी टोरेंट कंपनीकडून या संपूर्ण प्रकारची चौकशी केली जाणार असून नागरिकांना सुयोग्य सुविधा मिळतील याबाबत शाश्वती देण्यात आली.

 485 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.