ठाणे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा पोहोचला ६१५ वर

आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू

ठाणे शहरात एकाच दिवसात ११ नवीन रुग्णाचा समावेश तर, दोघांचा मृत्यू  

 ठाणे : ठाणे महानगर पालिका  हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी एकाच दिवसात ११ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  त्यापाठोपाठ नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये प्रत्येकी नऊ तर, कल्याण डोंबिवलीत तीन तसेच ठाणे ग्रामीण मध्ये एका रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा ६१५ वर पोहोचला असून आता पर्यंत १९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.    दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या शहरात कोरोन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात या प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात चाळी व दाटीवाटीच्या वस्त्या आहेत. तसेच याच शहरांमध्ये कोरोनाबाधीतांचा वाढणारा आकडा हि चिंतेची बाब ठरत आहे. शनिवारी ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत एकाच दिवशी ११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २०९ वर पोहोचली आहे. तर, मृतांचा आकडा आठ इतका झाला आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत तीन नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून रुग्णांची संख्या ११७ वर गेली. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नऊ रुग्णाची नोंद झाली असून तेथील रुग्णांची संख्या ११२ इतकी झाली आहे. तसेच, मीरा भाईंदर मध्ये नऊ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा १२९ वर पोहोचली आहे. तसेच ठाणे ग्रामीणमध्ये एका रुग्णाची नोंद करण्यात आल्यामुळे इथील बाधितांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा संख्या ६१५ वर गेली आहे. तर, शनिवारी भिवंडी महापालिकेसह अंबरनाथ आणि बदलापूर या भागामध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

 542 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.