वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा निर्णय
लातूर-मुंबई : राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता या आजारावरील सर्व चाचण्या मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आणि दंत महाविद्यालांमध्ये व रूग्णालयात या सर्व चाचण्या मोफत निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
या आजाराची चाचणी करण्यासाठी खाजगी लॅबकडून ४ हजार ४०० रूपयांची आकारणी करण्यात येत होती. तर शासकिय रूग्णालयातही या चाचणीसाठी काही शुल्क आकारण्यात येत होते.
कोरोना आजार हा महामारी असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे. तसेच या आजाराच्या रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही वाढती संख्या विचारात घेवून या आजाराची चाचणी आणि उपचार मोफत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींनी पुढे यावे आणि आजाराची चाचणी करून घेवून उपचार करून घ्यावेत असे आवाहन करत यामुळे आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोकाही थांबेल असा विश्वास व्यक्त केला.
राज्य सरकारच्या यानिर्णयामुळे जास्तीत जास्त चाचण्या आता राज्यात होतील असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी दाखविला.
553 total views, 1 views today