कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीची सुरुवात या चार शहरातून होणार

वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे मागणी करण्यात आली. या मागणीस आता केंद्र सरकारने आज मंजूरी दिल्याने या उपचार पध्दतीचा वापर लवकरच राज्यातील रूग्णालयातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटरवरून दिली.
सुरुवातीला ही उपचार पध्दती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रूग्णालयातून, आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या सिव्हील हॉस्पीटलमधून सुरु होणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथील रूग्णालयातून सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 656 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.