नगरसेविका मनीषा तारे यांचे मुख्यमंत्री निधीतही योगदान

गरजू लोकांना धान्य वाटप करण्याबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाख रुपयांची केली मदत

कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोणा विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगी देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहना प्रतिसाद देत कल्याण मधील प्रभाग क्र. १९ वायले नगरच्या नगरसेविका मनीषा साईनाथ तारे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख रुपये मदत देऊ केली आहे. नगरसेविका तारे यांच्याकडून प्रभागातील गरजू नागरिकांना मोफत धान्य वाटप, स्वस्त दरात भाजीपाला वाटप सुरू आहे. यावेळी मनीषा तारे यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारचे हात बळकट करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील इतर लोकप्रतिनिधीनी देखील मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनीषा तारे यांनी केले आहे.
माता जिजाऊ, रमाई, सावित्रीबाई फुले,सिंधुताई सकपाळ या आमच्या आदर्श आहेत. राष्ट्राच्या जडणघडणीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांचं देखील योगदान असल्याचे इतिहास साक्ष देत आहे. त्यामुळे या कठीण आपत्तीजनक परिस्थितीत राष्ट्रासाठी, माझ्या बांधवासाठी आम्हा सावित्रीच्या लेकींची ही तेवढीच जबाबदारी आहे आणि ती निभावणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. तसेच महाराष्ट्राला प्रथमच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने कुटुंब प्रमुख मिळाला आहे. आशा कठीण प्रसंगी त्यांनी मदतीचे आव्हान केले असतांना आम्ही जिजाऊंच्या लेकी गप्प कशा बसणार असे मत नगरसेविका मनीषा साईनाथ तारे यांनी व्यक्त केले.

 637 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.