महापालिका सीएसआर फंडासाठी ठेकेदार संघटनेचा मदतीचा हात

महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका युध्दपातळीवर कार्यरत आहे. इच्छुकांनी महापालिकेच्या सीएस आर (corporate social responsibility) फंडासाठी मदतीचा हात द्यावा असे आवाहन महापालिकेने केले होते. या आवाहनाला महापालिका क्षेत्रातील ठेकेदारांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी केली होती. त्यानुसार महापालिका ठेकेदार संघटनेने महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते आज २५ लाख ५४४ रुपयांचा धनादेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना सुपुर्द केला.

संपूर्ण जगभर कोरोनाचा फैलाव होत आहे. ठाण्यात देखील कोरोनाचे रुगण आढळल्यानंतर या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका युध्दपातळीवर काम करीत आहेत. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या निश्चीतच खर्चीक आहे. त्यामुळे महापालिकेला सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून ठाणे महानगरपालिका ठेकेदार संघटनेने सर्व ठेकेदारांना आवाहन करुन २५ लाख ५४४ रुपये इतकी रक्कम जमा केली. सदरचा धनादेश आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते आयुक्त विजय सिंघल यांना सुपुर्द करण्यात आला. महापालिकेच्या मदत कार्यात ठाणेकर नेहमीच पुढाकार घेत असतात. या संकटकाळात देखील ठाणेकर हे महापालिकेच्या पाठीशी आहेत अशी अशा व्यकत करुन महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका ठेकेदार संघटनेचे आभार व अभिनंदन व्यक्त केले. तर आयुक्त ‍विजय सिंघल यांनी देखील ठेकेदारांचे आभार मानले. यावेळी ठाणे महानगरपालिका ठेकेदार संघटनेच्यावतीने प्रतिनिधीक स्वरुपात रंभाजी जगताप, अभय पाटील, प्रदीप नरे, विकास दाभाडे, प्रमोद पवार आदी उपस्थीत होते.

 448 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.