टीएमटी एम्पलॉईज युनियनचा मदतीचा एक हात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाखांची मदत महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्यशासन युध्दपातळीवर कार्यरत आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी इच्छुकांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी केले आहे. या आवाहन साथ देत देत ठाणे प रिवहन सेवेतील टीएमटी एम्पलॉईज युनियनने ५ लाखांची मदत देण्याचे ठरवून या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायतानिधीस देणेकरिता महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे सुपुर्द केला.

संपूर्ण जगभर कोरोनाचा फैलाव होत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाने थैमान घातले असून याचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्य करीत आहे. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या निश्चीतच खर्चीक आहे. यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीचा हात द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा व एक सामाजिक बांधीलकी या नात्याने ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतीटल टीएमटी एम्पलॉईज युनियनने ५ लाखांची मदत देण्याचे ठरविले. या मदतीचा धनादेश या कर्मचाऱ्यांनी आज महापौर नरेश म्हस्के यांना सुपुर्द केला. यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी या कर्मचाऱ्यांचे आभार व अभिनंदन केले. यावेळी टीएमटी एम्पलॉईज युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख, जनरल सेक्रेटरी सुनील महामुणकर, खजिनदार मनोहर जांगळे, उपाध्यक्ष गोविंद सुर्यवंशी शिवाजी शिंदे, सेक्रेटरी विजय आदी उपस्थीत होते

 974 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.