ठाण्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आढावा

सोशलडिस्टन्सींगचे पालन करण्यात येते की नाही यासाठी लक्ष ठेवण्यासाठी प्रभागसमितीनिहाय अंमलबजावणी करण्याचे निर्देश

ठाणे : ठाण्यातील कोरोनाबाधीत रुग्ण एकीकडे बरे होत असले तरी दुसऱ्या बाजूला दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहे. महापालिका क्षेत्रात बरे होत असलेले रुग्ण व संशयित रुग्ण त्याचबरोबर कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर रुग्णांना उपचार घेण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व इतर बाबींचा आढावा आज महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त ‍विजय सिंघल यांनी प्रत्यक्ष चर्चा करुन घेतला.

        यावेळी खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे, ‍ स्थायी  समिती सभापती राम रेपाळे, तसेच महापालिकेचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थीत होते. ठाणे शहरात कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही खाजगी हॉस्पीटल निश्चीत करण्यात आली आहे, तसेच आजारनिहाय देखील रुग्णालयांचे वर्गीकरण केले असून याचा आढावा आज महापौरांनी घेतला.

        कोरोनाचा फैलाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने वाढत आहे, त्यामुळे सर्वांनी सोशल डिसटन्सींगचा अवलंब करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून सोशलडिस्टन्सींगचे पालन करण्यात येते की नाही यासाठी लक्ष ठेवण्यासाठी प्रभागसमितीनिहाय अंमलबजावणी करणे गरजेचे असून यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना देखील महापौरांनी या बैठकीदरम्‌यान दिल्या. तसेच विभागवार महापालिका प्रशासनामार्फत जे सर्व्हेचे काम सुरू आहे, त्यास नागरिकांनी सहकार्य करावे तसेच या कामी नियुक्त  अधिकारी कर्मचारी यांची देखील महापालिकेने योग्य ती दक्षता घ्यावी. महापालिकेने ज्या ‍ ठिकाणी नागरिकांना कोरंटाईन केले आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, जेणेकरुन या नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबतची सर्वंकष चर्चा या बैठकीत करण्यात आली.

        कोरोनाचे गंभीर रुप लक्षात घेता जिल्हा व महापालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे तसेच घाबरुन न जाता दक्ष रहावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.

 471 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.