आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिला कष्टकरी जनतेला दिलासा

गरीब व गरजू नागरिकांना केले मोफत २ टन धान्याचे वितरण
 

नवी मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना आपल्या मतदारसंघात कोरोनावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनेक ठिकाणी धान्याची चणचण भासत असताना तसेच हातावर पोट असलेल्या गरीब व गरजू नाका कामगार यांची आवश्यकता ओळखून बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामार्फत आज मोफत धान्याचे वितरण करण्यात आले. यापूर्वीही आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, प्रत्येक घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मोफत मास्क तसेच सॅनिटायजर्स वारंवार वाटप करण्यात आले आहेत. तसेच गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंची तसेच जेवणाची व्यवस्था अजूनही करण्यात येत आहे. आतापर्यंत बेलापूर विधानसभा क्षेत्रातील गरजू कामगार वर्ग, नेरूळ-सीबीडी बेलापूर येथील आदिवासी नागरिक, तुर्भे येथील नाका कामगार, दगडखाण कामगार  तसेच अत्यंत गरजवंतांना सुमारे २० टन धान्य वाटप स्वखर्चाने करण्यात आले असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिली.  
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, माझ्या बेलापूर मतदारसंघातील सर्व परिस्थितीचा मी स्वतः आढावा घेत आहे. नागरिकांना कोठेही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही याची दक्षता घेत असून घरपोच किराणा माल पोहोचविण्याची तसेच विना रेशनकार्ड धारकांना धान्य कसे मिळेल या सर्वांची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. बेलापूर मतदारसंघातील नाका कामगार, दगडखाण कामगार, आदिवासी नागरिक यांना धान्याची कमतरता भासत आहे. हातावर पोट असलेल्या या गरीब व गरजुंना एक वेळच्या जेवणाचीही चणचण भासत आहे. अशावेळी त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. आपल्या देशावर बिकट संकट आले असताना माझ्या मतदारसंघातील एकही व्यक्ती असमाधानी राहणार नाही, याची काळजी मी घेत आहे.    

 693 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.