ज्यू.के.जी ते दहावी पर्यंत ऑनलाईन शिक्षण वर्ग

कल्याणच्या मेरिडियन शाळेने शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांच्या सहभागातून सुरू केला उपक्रम

कल्याण : कोरोनामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला असताना याचा परिणाम शाळा व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर ही होताना दिसत आहे तसेच सर्वत्र लॉकडाऊन मूळे शाळा बंद करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यासामध्ये कुठेही खंड पडू नये तसेच शिक्षक व विद्यार्थी नियमित संपर्कामध्ये राहावेत या उद्देशाने online lectures चा फॉर्मुला विद्यार्थ्यांसाठी
कल्याणच्या मेरिडियन स्कूल या इग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेने ज्यू.के.जी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शनिवार ६० मिनिटाचे एक लेक्चर्स असे तीन लेक्चर्स (lectures) शाळेने सुरु करण्याचा मान पटकावला आहे
आणि याला पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शाळेचे संचालक डॉ.विनोद कुलकर्णी व मुख्याध्यापिका भाग्यश्री पिसोळकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे वरील online lectures यशस्वीरित्या शाळेने सुरू केली असून विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना संचालक डॉ विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की सध्या लॉकडाऊन मुळे शाळा आणि विद्यार्थी यांचा संपर्क होत नसल्यामुळे प्रत्येकजण वर्क फ्रॉम होम याचा पुरेपूर फायदा सर्वांना व्हावा तसे विद्यार्थ्यांचे ही अभ्यासामध्ये कोणते ही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या चर्चेतून हा उपक्रम सुरू केला असून त्याला विद्यार्थ्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे असे डॉ कुलकर्णी यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले

 417 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.