पिंपरी गावात लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आरोग्य तपासणी

कल्याण संपर्क अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी( प्रशासन) डी. वाय.जाधव यांनी दिली भेट

ठाणे : कामाच्या शोधात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या कुशल, अकुशल कामगारांची वस्ती असलेल्या  कल्याण पंचायत समिती अंतर्गत असणारी ग्रामपंचायत पिंपरी येथे कल्याण लोकसभेचे खासदार .डाॅ श्रीकांत शिंदे यांच्या वतीने डाॅ.मिलिंद शिंदे (निआन हाॅसपिटल)  यांच्या माध्यमातून मंगळवारी नागरिकांची कोरोना प्राथमिक तपासणी करण्यात आली.

या आरोग्य तपासणी शिबिराला  उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) तथा कल्याण तालुका संपर्क प्रमुख डी. वाय.जाधव यांनी भेट दिली. यावेळी  जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील  उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती घेत सगळ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. या दरम्यान त्यांनी पिंपरी येथील कम्युनिटी किचनला भेट देऊन कसा प्रकारे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे याची माहिती घेतली. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोराना प्रतिबंधात्म उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय खातेप्रमुखांची प्रत्येक तालुक्यात संपर्क प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. जाधव यांना कल्याण तालुक्याचे संपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आज दौरा केला. यावेळी ग्रामसेवक पावसे उपस्थित होते.

 581 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.