मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाखांची मदत

धनादेश आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे सुपूर्द

अंबरनाथ :अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील इंदोर कॉम्पोसाईट प्रा.लि या कंपनीने मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड१९ साठी दोन लाखांचा धनादेश कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोंक संघवी यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीत भरघोस मदत करावी याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करावी असे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गेल्या आठवड्याभरात अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातुन मुख्यमंत्री सहायता निधीत १५ कोटि हुन अधिक निधी जमा झालेला असून या मदतीचा ओघ अद्याप सुरूच आहे. बुधवारी ही अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील इंदोर कॉम्पोसाईट प्रा.लि या कंपनीने मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड१९ साठी दोन लाखांचा धनादेश आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे सुपूर्दकेला असून आमदार डॉ. किणीकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, आमाचे अध्यक्ष उमेश तायडे, विजयन नायर, इंदोर कॉम्पोसाईटचे व्यवस्थापकीय संचालक रोनक संघवी, व्यवस्थापक संजय तावरे आदी उपस्थित होते

 590 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.