सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांनाही मिळाला दिलासा
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार असेल तरी एप्रिल महिन्याचे वेतन नेहमीप्रमाणे एकाच टप्प्यात देण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांनाही एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार एकाच टप्प्यात मिळणार आहे.
मार्च महिन्यातील पहिल्या टप्प्याचे वेतन देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या वेतनासाठीही लवकरच आदेश काढण्यात येईल. राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
करोना व्हायरसमुळे मागच्या महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन आहे. एप्रिलचा पूर्ण महिना राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सरकारच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे कर संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.
509 total views, 2 views today