रोज ५०० आदिवासींना जेवण
बदलापूर : कोरोनाच्या या लढाईत गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य मिळावे यासाठी बदलापूर आणि आसपासच्या आदिवासी बांधवाना मदत करण्यासाठी पार्थ पवार फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहर संयुक्त पणे प्रयत्न करीत आहे. दिड हजार लोकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. शिवाय रोज पाचशे आदिवासी बांधवाना जेवण देण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी दिली.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यांतर्गत संचार बंदी वाढली आहे. रोजगार नसल्याने अनेकांना जीवनावश्यक धान्य व भाजीपाला घेणं अवघड झालं आहे. गोरगरीब जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून बदलापूर शहर आणि परिसरात गरजू लोकांना धान्य आणि भाजीपाला वाटप करण्यात येत आहे. जवळपास १५०० हून अधिक लोकांपर्यंत ही मदत पोहचली आहे. तीन किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, तीन किलो कोबी, तीन किलो सिमला मिरची आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. याच बरोबर रोज पाचशे आदिवासी बांधवाना विनामूल्य जेवण देण्यात येत असल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितलॆ
688 total views, 3 views today