संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या मास्कचे वाटप करणार असल्याची शरद पवारांची माहिती
मुंबई : कोरोना रुग्णसेवेतील डॉक्टर्स व आरोग्यसेवकांसाठी संपूर्ण चेहरा झाकणारी सव्वा लाख सुरक्षा आवरणे तयार करून वितरित करण्याचे काम राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने हाती घेण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून करत आहेत. शिवाय सोशल मीडियावर या आजाराबाबत शंका आणि घ्यावयाची काळजी व उपाययोजना याची माहिती ते देत आहेत.
जीवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व यंत्रणा कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी आरोग्यसेवकांची सुरक्षितता ही आपली जबाबदारी समजून सुरक्षा आवरणे वाटप करण्याचे काम सुरू केले आहे.
589 total views, 1 views today