आणखीन दोन कोरोनाग्रस्त ; रुग्णांची संख्या ६ वर
भिवंडी : कामगारांची नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत शहर आणि ग्रामीण परिसरात ११ एप्रिलपर्यत एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. मात्र कोरोना आजाराने आता तालुक्यात फैलाव केला असून गेल्या ७ दिवसात भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात ६ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्यापैकी एक रुग्ण हा पोलीस कर्मचारी असून तो कोनगाव परिसरात कुटुंबासह वास्तव्याला आहे. तर दुसरा कोरोना बाधित रुग्ण हा कशेळी गावातील रहिवाशी असून तो ठाणे महापालिकेचा कर्मचारी आहे मात्र त्याची सेवा आरोग्य विभागात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुर्गेश साज सोसायटी सिल करून त्यांच्या कुटंबीयांना देखील आज
तपासणी साठी ठाण्याला आणलं असल्याची माहिती मिळाली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव आता भिवंडीतही वाढू लागला आहे. सर्वात पहिला रुग्ण शहरातील बंगालपुरा येथे एक तर दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील पडघा – बोरिवली येथे एक महिला असे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यांनतर १७ एप्रिलला शहरातील वेताळपाडा व अवचितपाडा या भागात दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली होती. आता मात्र नव्याने दोन रुग्णांची भर पडल्याने एकूण ६ रुग्णांची भिवंडी शहर व ग्रामीण भागात नोंद झाली आहे.. संवेदनशील व कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासन व पोलीस व महानगरपालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र अनेक ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी व कचरा उचलण्यास दिरंगाई केली जात असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
ग्रामीण भागातील कोनगाव परिसरात राहणारा पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा पोलीस कर्मचारी मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असून याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरिक्षका सह अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर लागण झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील ५ जणांना कोरोटाईन केंद्रात दाखल करण्यात आले. तर दुसरा रुग्ण ठाणे महानगर पालिका स्वच्छता विभागात मुकादम म्हणून काम करणारा असून या रुग्णा ला ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर त्यांच्या कुटुंबातील ४ व्यक्तींना टाटा आमंत्रण येथील कोरंटाईन सेंटर मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती प्रांत अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली. हा रुग्ण ज्या कशेळी ग्रामपंचायतीच्या भागात वास्तव्यास आहे. त्या ठिकाणी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ डावखरे व त्यांचे आरोग्य पथकाने स्थानिक नारपोली पोलिसांच्या मदतीने रुग्णाच्या इमारती लगतच परिसर सील करीत नागरीकांची आरोग्य तपासणी सुरू केल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे .
भिवंडी शहर व ग्रामीण भाग काही दिवसांपासून करोना पासून सुरक्षित असताना भिवंडी शहरात ३ तर ग्रामीण मध्ये ३ असे एकूण ६ रुग्ण तालुक्यात आढळून आल्याने तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. तर करोनाचा सामना करण्यासाठी नागरीकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत सोशल डिसटेंसिंग पाळावे व अनावश्यक घरा बाहेर पडू नये असे आवाहन भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी केले आहे …
742 total views, 1 views today