महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुमन अग्रवाल यांनी जपले दायित्व
ठाणे : भारतासह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.तरीही,नागरीकांनीही सातत्याने गरम पाण्याचे सेवन करून काळजी घेतल्यास या महामारीवर मात करणे शक्य होणार आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंना पत्र पाठवून महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये “हॉट वॉटर डिस्पेन्सर मशीन” बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार,खारीचा वाटा म्हणुन,सुप्रयास फाऊंडेशनच्या संस्थापक,अध्यक्षा सुमन अग्रवाल यांनी कोव्हीड-१९ जाहिर झालेल्या ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयाला दोन हॉट वॉटर डिस्पेन्सर मशिन सुपूर्द केल्या.त्याचबरोबर, रूग्णालयासाठी लागणारे मास्क,सॅनिटायझर व जंतुनाशके पुरवण्याचे आश्वासन दिले.सुमन अग्रवाल यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार यांनी कौतुक केले आहे.
महाराष्ट्रात विशेषता मुंबई व ठाणे परिसरात कोरोनाचे संकट घोंघावत आहे.दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई व ठाणे जिल्हयाचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे.अशा बिकट परिस्थितीत राज्य सरकार कोरोना विरुद्धची लढाई लढत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे. जगभरातील वैज्ञानिकांच्या मतानुसार,सोशल डिस्टन्सींगसोबतच या आजारावर उष्णता अत्यंत परिणामकारक असल्यामुळे गरम पाण्याचे सेवन केल्यास निश्चितपणे फायदा मिळतो.तेव्हा, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी,महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये “हॉट वॉटर डिस्पेन्सर मशीन” बसविण्यात यावी.अशी मागणी सुमन अग्रवाल यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्याकडे केली होती.तसेच, गरम पाण्याच्या या मशीनमुळे फक्त कोरोना बाधीतांसह इतर रुग्णांना आणि डॉक्टर्स ,नर्सेससह इतर कर्मचारीवर्गाच्या आरोग्याचे कोरोनापासून संरक्षण होईल.असेही नमूद केले होते.
दरम्यान, ठाणे जिल्हयात कोरोना बाधीतांचा आकडा अडिचशेच्या पुढे पोहचल्याने या रुग्णांचा भार मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयावर येऊ नये,तसेच जिल्ह्यात आढळून येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत.यासाठी ठाण्याचे सिव्हील रुग्णालय हे पूर्णतः कोविड – १९ रुग्णालय म्हणून कार्यन्वीत करण्यात आले.या पार्श्वभूमीवर,सिव्हीलमधील रुग्ण व कर्मचाऱ्यांसाठी गरम पाण्याची व्यवस्था व्हावी.म्हणुन,अग्रवाल यांच्या सुप्रयास फाऊंडेशनच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार यांच्या उपस्थितीत सिव्हील रुग्णालयातील महिला व पुरुष कक्षात दोन अत्याधुनिक हॉट वॉटर डिस्पेन्सर मशीन सुपूर्द करण्यात आल्या.
596 total views, 1 views today