कोरोनाबाधित १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले
ठाणे : ठाणे शहरात कोरोना कोव्हीड – १९ बाधित रुग्णांवर महापालिकेच्यावतीने अनेक उपाययोजना राबविण्यात असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. आजपर्यंत एकूण १२ रूग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात औषध फवारणी, ताप बाहयरुग्ण विभाग, नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सची प्रभावी अंमलबजावणी, तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे तपासणी, बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून यापुढेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
681 total views, 2 views today