शेअर बाजाराला एफएमसीजी क्षेत्राचा आधार

एस अँड पी बीएसई एफएमसीजीदेखील ४.३३% च्या वृद्धीवर गेला

मुंबई : ३० एप्रिलपासून लॉकडाऊन शिथील होण्याच्या आशेने एफएमसीजी क्षेत्राने शेअर बाजाराला चांगलाच आधार दिल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. निफ्टीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, डाबर, नेस्टले, आयटीसी आणि मॅरीकोसारख्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. बंद होताना ते ४ टक्क्यांच्या वृद्धीवर होते. युनायटेड ब्रेवरीज, युनायटेड स्पिरीट्स, पी अँड जी व इमामी या कंपन्यांचे शेअर्स शेवटच्या काही तासात तणावाखाली दिसल्या. एस अँड पी बीएसई एफएमसीजीदेखील ४.३३% च्या वृद्धीवर गेला. या ४३ कंपन्या फायद्यात तर २५ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव घसरले. या गटात डीएफएम फुड्सचे शेअर्स संपूर्ण दिवसाच्या व्यापारात १९.९९ टक्क्यांनी वाढले.

बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्रांना बसला फटका

निफ्टी बँकेत कोटक बँकेला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला असून तो ६.१७ टक्के एवढा होता. एचडीएफसी बँकेचे शेअर्सदेखील ३.५८% नी घसरले. त्यानंतर बंधन बँकेचे ३.२१% तर बँक ऑफ बडोदाचे शेअर्स १.८१%नी घसरले. इतर इंडसइंड बँक, आरबीएल बँक, फेडरल बँकेने अनुक्रमे १.८ ते ३.३% दरम्यान वृद्धी केली. हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर आणि मारुती सुझूकी यांचे शेअर्स एनएसई‌वर अनुक्रमे ४.९५%, ४.६६% आणि ३.५७%नी घसरले. आरआयएल, टाटा पॉवर, ओएनजीसी आणि पॉवर ग्रिडमधील घसरणीसह ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सनाही मोठा फटका बसल्याचे अमर देव सिंह यांनी सांगितले.

फार्मा कंपन्यांतही उदासीनता

निफ्टी फार्माने आज बाजारातून दुरावा राखल्याचे चित्र असून ते क्षेत्र ०.०६% ची घसरण घेऊन बंद झाले. या यादीतील फक्त डिव्हिस लॅबोरेटरी, ऑरबिंदो फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी या तीन कंपन्यांचे शेअर्स फायद्यात होते. कॅडिला हेल्थचे शेअर्स ४.१४% तर टोरेंट फार्माचे शेअर्सदेखील ३.३२% नी घसरले.

 543 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.