आणि रहिवाश्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले ‘त्याचे’ स्वागत

ठाणे ग्रामीणच्या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर स्वगृही परतल्यावर नागरिकांनी केले उस्फुर्त स्वागत

ठाणे : रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येताच, परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरात राहून, गॅलरित, गच्चीत, खिडकी जवळ येऊन उस्फुर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या ठाणे ग्रामीणच्या व्यक्तींचे नागरिकांनी स्वागत केले.

कोरोनामुळे भीतीच्या सावटाचे वातावरण आजूबाजुला आहे. कल्याणच्या परिसरात काही दिवसांपूर्वी संशयित म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यावर सर्व वैदकीय सोपस्कार पूर्ण करून बुधवारी घरी आणण्यात आले, तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्याचे टाळ्यांची आतषबाजी करत स्वागत केल्याने सकारात्मक वातावरण या निमित्ताने पाहायला मिळाले.

सध्या कोरोनाच्या संकटाचे राज्य मुकाबला करत आहे.महामारीच्या संकटाने सगळीकडेच नकारात्मकचे चित्र निर्माण झाले आहे.ज्या व्यक्ती, कुटुंबाना केवळ घरात अलगीकरन केले हे अशा व्यक्तींकडे देखील भीतीच्या भावनेने नागरिक पाहताना दिसत असताना कल्याण मधील अशी उस्फुर्त घडलेली घटना संबंधीत व्यक्ती आणि कुटुंबाला सकारात्मक बळ देणारी, त्याचा आत्मसन्मान वाढवणारी आहे.

ठाणे ग्रामीण हद्दीतील हा व्यक्ती असल्याने पुढील काही काळासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे आणि त्यांची टीम त्या रुग्णाशी पूर्णतः संपर्क ठेवून असणार आहे.
ठाणे ग्रामीण मध्ये तीन व्यक्तींपैकी दोन व्यक्तींना निगेटिव्ह अहवाला नंतर घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे.

 449 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.