एन एन एसच्या स्वयंसेवकाना प्रोत्साहित करण्यासाठी विश्वभान प्रतिष्ठानचा उपक्रम
मुंबई : मुंबई आणि परिसरात कार्यरत असलेल्या विश्वभान प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने एन एस एस च्या स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. कोरोनाने सर्वांना घरी बसविले आहे. याचा फायदा घेत अनेक स्वयंसेवक आपली प्रतिभाशक्ती उपयोगात आणून कोरोना विरुद्ध कसा लढा देता येईल ते समाजापर्यंत पोचवत आहेत. एन एस एस च्या ब्रीदाला जागणाऱ्या स्वयंसेवकांना प्रोत्साहित करण्यासाठी विश्वभान प्रतिष्ठानने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेचा कालावधी १४ एप्रिलपर्यत असणार आहे. ऑनलाईन असणाऱ्या या स्पर्धेत फक्त कोरोना अर्थात ‘जैविक युद्ध – कोरोना’ या विषयावर कविता, कथा, लेख, डिजिटल पोस्टर, अनुभव कथन व्हिडिओ(३० सेकंद),घोषवाक्य, पथनाट्य(फक्त संहिता) एकपात्री अभिनय(१मिनिट) यांचा समावेश आहे. हि स्पर्धा सर्व विद्यापीठातील स्वयंसेवकासाठी खुली असून या स्पर्धेत मराठी, हिंदी आणि इंग्रजीत आपले साहित्य पाठवता येईल.विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. आपली प्रवेशिका पाठवताना स्पर्धकांना विद्यापीठाचे नाव, भ्रमणध्वनी नोंदवणे बंधनकारक आहे. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका sansarejagdish007@gmail.com , vishwbhaan.p@gmail.com या ईमेल पाठवाव्यात असे आवाहन विश्वभान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जगदीश संसारे यांनी केले आहे.
648 total views, 1 views today