लॉक डाऊन मूळे निर्माण झालेल्या सर्व सामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष साटम यांनी केली मागणी
ठाणे : कोविड १९ कोरोनामूळे देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे त्याचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावर पडत आहे सर्व उद्योग धंदे व कंपन्या बंद आहेत. लोकांचे हाल होत आहेत हातावर पोट असणाऱ्या लोकांची वाईट अवस्था आहे .महाराष्ट्र सरकार कडुन मदत होत आहे पण आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने ठाणे महापालिकेने ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचे टॅक्स त्वरित माफ करून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष साटम यांनी ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
1,026 total views, 1 views today