वडाळ्यातील एस. एस. जी. फाऊंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी

दररोज जवळपास ४ हजार लोकांची जेवणाची व्यवस्था

मुंबई :  वडाळ्यातील एस. एस. जी. फाऊंडेशन हा गत दोन वर्षात कबड्डीत नावारूपाला आलेला संघ. खेळा बरोबरच या संघाने आपली सामाजिक बांधीलकीही जपली आहे. कोरोनाच्या देशव्यापी संकटामुळे देशात “लॉकडाउन” करण्यात आले. यात हातावर पोट असलेले अनेक जण बेरोजगार झाले. अशा बेरोजगार झालेल्या वडाळ्यातील पारधीनगर येथील गरीब लोकांना हे मंडळ २३मार्च पासून दोन वेळचे जेवणाचे वाटप करीत आहे. त्याच बरोबर त्या भागात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस बांधवाना देखील त्याचे वाटप करण्यात येते. दररोज जवळपास ४हजार लोकांना याचे वाटप करण्यात येते. पुरीभाजी, पुलाव, मसालेभात, डाळखिचडी असे वेगवेळ्या प्रकारचे पॅकेट त्यांना पुरविण्यात येतात.    याकरिता मंडळाचे प्रमुख आश्रयदाते व सामाजिक कार्यकर्ते शरद गावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. त्याच बरोबर नगरसेविका स्मिता गावकर, अध्यक्ष सचिन गावकर यांच्या सहकार्याने संदेश घाडगे, प्रो-कबड्डीचा उदयोन्मुख तारा व यंदाची राजस्थान येथील राष्ट्रीय स्पर्धा गाजविणारा पंकज मोहिते आणि मंडळातील सर्वच कबड्डी खेळाडू या सामाजिक उपक्रमात हिरिरीने सहभाग घेऊन हे सामाजिक कार्य करीत आहेत

 549 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.