ठाण्यात कोरोनाचे दोन रूग्ण बरे झाले

वैद्यकीय चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज

ठाणे : कोरोना कोवीड ९ ची बाधा झालेल्या रूग्णाची १४ दिवसांनंतर केलेल्या चाचणीचा आहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना काल रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन झाली आहे.
यापूर्वी कासारवडवली येथे राहणाऱ्या रुग्णाला फ्रान्सवरून आल्यानंतर कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने १२ मार्च रोजी कस्तुरबा गांधी हॅास्पीटल येथे चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. १४ दिवसांनंतर केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले होते.
त्याचबरोबर दोस्ती विहार येथे राहणाऱ्या रुग्णाला रूग्णालयातून काल ७ एप्रिल रोजी डिस्चार्ज करण्यात आले आहे. हा रुग्ण लंडनवरून आल्यानंतर २७ मार्चला फोर्टिज हास्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ३० मार्चला त्यांना कोरोना बाधीत म्हणून घोषित करण्यात आले होते. १४ दिवसांनंतर कोरोना कोवीड १९ च्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना काल फोर्टिजमधून डिस्चार्ज करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या दोन झाली आहे.

 589 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.