२४ तासात २० जणांवर सायबर गुन्हे

खोट्या बातम्या, अफवा पसरवल्या बद्दल करण्यात आली कारवाई

मुंबई : राज्यात आपतकालीन कायदा लागू केलेल्या असतानाही काहीजणांकडून कोरोना आजाराच्या अनुषंगाने खोट्या बातम्या, अफवा आणि एखाद्या समाजाविषयी तिरस्कार युक्त प्रक्षोभक साहित्य प्रसारीत केल्याप्रकरणी मागील २४ तासात २० जणांच्या विरोधात सायबर कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागाचे अधिक्षक बालासिंग राजपूत यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी १४ गुन्हे हे धार्मिक स्वरूपाचे साहित्य आणि कोरोनाच्या संदर्भात अफवा पसरविल्याप्रकरणी ६ जणांवर दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी जालना जिल्ह्यात ५, उस्मानाबाद जिल्ह्यात १, हिंगोलीत १, बुलढाण्यात २, बीडमध्ये १०, नाशिक मध्ये १, अमरावती शहरात १ आणि कोल्हापूरात ९ गुन्हे दाखल करण्॰यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सायबर विभागाकडून खोट्या बातम्या पसरविणे, अफवा पसरविणेप्रकरणी १३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे साहित्य प्रसारीत केल्याप्रकरणी ४९ गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी ३५ जणांना अटक करण्यात आली आहे तर २८ जणांची ओळख पटलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअपसह इतर माध्यमातून अनेकांकडून अशाप्रकारचे अफवा खोट्या माहिती प्रसारीत होण्याचा संभव असल्याने यासंदर्भात सर्व व्हॉट्सअप ग्रुप अँडमीन आणि सर्वांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 4,464 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.