नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले

नवी मुंबईत काकामुळे पुतण्या आणि पुतणीला कोरोना


नवी मुंबई: नवी मुंबईत कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३०वर गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काकामुळे पुतण्या आणि पुतणीला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

कोपरखैराने सेक्टर १९मध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या व्यक्तीच्या कुटुंबीताल आणि संपर्कातील एकूण ७ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी पाचजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. आज पॉझिटिव्ह आढलेले हे दोन्ही रुग्ण या व्यक्तीची पुतणी आणि पुतण्या आहेत. त्यामुळे एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या कुटुंबातील पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर ते राहत असलेली इमारत पूर्णपणे सील करण्यात आली होती. या इमारतीतील सर्वांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. तसेच या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. आज पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने हे कुटुंब राहत असलेल्या एक किलोमीटर परिसरात औषधांची फवारणी करण्यात येत आहे.

 457 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.