कामगारांनी कामावर येऊ नये :- कामगार नेते आमदार.शशिकांत शिंदे यांचे माथाडी ,सर्व कामगारांना आवाहन.
नवी मुंबई : बाजार समिती मध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यापारी रुग्ण आढळलेला आहे. त्यामुळे परवा पर्यंत बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी शासनाला केली आहे. परवा पासून बाजार बंद होईल.
माथाडी कामगारांनी व इतर कामगारांनी बाजार समितीत येण्याची तसदी घेऊ नये. आपल्या घरी राहून स्वतःची व कटुंबाची काळजी घेण्याचा आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
मुंबई , नवी मुंबई मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आपल्या परिवाराची व आपली काळजी घेणे आवश्यक आहे. कामगार जर गावी असतील तर गावीच राहावे, आणि जर इथे नवी मुंबईत असतील तर स्वतःच्या घरी राहावे, कामावर येऊ नये अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.
570 total views, 2 views today