शिवसेना नगरसेवक तुषार बेंबळकर यांचा उपक्रम
बदलापूर : नागरिकांना ‘कोरोनाला घाबरू नका,पण काळजी घ्या’ असे आवाहन करत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक तुषार बेंबळकर यांनी बदलापूर पश्चिम भागात स्वखर्चाने जंतुनाशक, सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे.
बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी, गणेशनगर, चर्च रोड आदी भागात स्वखर्चाने १० हजार मास्क, ५ हजार हँड वॉश, सॅनिटायझर, तसेच ३५० इमारतींना प्रत्येकी
५ लिटरच्या जंतूनशकांच्या कॅनचे वाटप केले. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांच्या घरोघरी जाऊन या साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना हँड वॉश वा सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करता यावेत, इमारतीत येणाऱ्या जाणार्याचे हात जिन्याचे कठडे व इतरत्र लागत असतात. त्याचे निर्जंतुकीकरण करता यावे यासाठी हे साहित्य वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नात हा आपला खारीचा वाटा असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक तुषार बेंबळकर यांनी सांगितले.
555 total views, 1 views today