कोपरित कोरोनाचा रुग्ण नाही परंतु सुरक्षेच्या दृष्टीने कोपरिच्या सर्व सीमा सील कराव्यात भरत चव्हाण यांची मागणी.
ठाणे : कोरोनाच्या दिवसात ठाणे शहरात मोठंया प्रमाणात महामारीचा फैलाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्थरावर प्रयत्न सुरू आहेत. कोपरी पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या नियोजनामुळे कोपरित कोणताही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, आगामी दिवसात याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोपरी संपूर्णपणे लॉकडाऊन करावी. ठाणे पश्चिम आणि मुंबई येथून येणारी वाहने तसेच भाजीविक्रेत आणि व्यक्तींना कोपरित येण्यास मज्जाव करावा. परिसरातील बरबांगला, सिडको बोगदा, हरिओम नगर आदी सीमा सील करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली आहे.
ठाण्यातील अनेक भागात कुठे ना कुठे कोरोनाचा रुग्ण आढळून येत असला तरी सुदैवाने कोपरित याची लागण झालेली नाही. कोपरी पोलिसांनी दिवस रात्र मेहनत घेऊन केलेली कामगिरी अभिनंदनास पात्र आहे. परंतु पुढच्या काळात कोपरित सुरक्षा अधिक कडक करावी लागणार आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने कोपरी लॉकडाऊन करावी अशी चर्चा नागरिक करत आहेत. आनंद नगर, बारा बांगला, सिडको बोगदा, हरिओम नगर चेक नाका या ठिकाणी पोलिसांची गस्त ठेवावी. आणि पोलीसबळ कमी पडत असेल तर त्यासाठी आमचे स्वयंसेवक तैनात ठवता येतील. या संदर्भाच निवेदन ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे पोलीस आयुक्त यांना दिले असल्याची माहिती नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली.
कोपरी परिसरात नुकतंच भाजीमार्केटची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी ठाण्याच्या विविध भागातून विक्रेते येतात. तसेच दुचाकी मोटरकार अशी वाहन बाहेरून येतात. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या मार्फत कोरोनाचा संसर्ग आला तर त्याचा नाहक भुर्दंड कोपरिकरना सोसावा लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस कोपरीचा सर्व सीमा बंद कराव्यात असे नगरसेवक भरत चव्हाण म्हणाले.
613 total views, 1 views today