एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा काही काळासाठी स्थगित

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतला निर्णय


मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे.
एमपीएसीच्या वतीने २६ एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि १० मे रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यमसेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकलली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या दोन्ही परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारीत तारखा यथावकाश आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील. तसेच परीक्षेची तारीख निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे अवगत करण्यात येणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकरण करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 467 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.