यशस्वी ट्रेडिंगकरिता या गोष्टींकडे असावे लक्ष !

नियम पाळल्यास नवशिका ही करू शकतो उत्तम कामगिरी

मुंबई : इतर अनेक कौशल्यांप्रमाणेच यशस्वी ट्रेडिंगची कला ही सराव आणि सतत दक्ष राहून शिकता येते. तसेच अधिक चांगली करता येते. ट्रेडिंगमध्ये जादूच्या कांडीसारखे परिणाम दिसावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. साहजिकच यामुळे त्यांच्या पदरी मोठी निराशा येते. या खेळाचे काही मूलभूत नियम पाळल्यास कुणीही नवशिका या व्यवसायात उत्तम कामगिरी बजावू शकतो आणि नफ्याचा आलेख उंचावू शकतो असा विश्वास एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हजचे मुख्य विश्लेषक समित चव्हाण यांनी व्यक्त केला

डेटावर विश्वास ठेवा

मार्केट जाणून घेणे आणि ते कसा आकार घेते, याविषयी माहिती ठेवण्यावर हा व्यवसाय अवलंबून असतो. अधिक चतुराईने गुंतवणूक करण्यासाठी मार्केटचे मूलभूत कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. एक ट्रेडर या नात्याने आपल्याकडे पुरसे ट्रेडिंग कॉल्स ,पुरेसा डेटा आणि योग्य संशोधन असणे गरजेचे आहे. या कामासाठी ज्यांच्याकडे समर्पित विश्लेषक असतात, अशा पूर्ण वेळ सेवा देणा-या ब्रोकिंग कंपन्यांकडून मार्गदर्शन मिळवता येईल. तंत्रज्ञानप्रणित रोबो सल्लागारांचा उदय झाल्यानंतर आज आपण या क्षेत्रातील एक मोठा बदलही अनुभवत आहोत. या उद्योगातील अग्रणी एकाच वेळेला एक अब्ज डेटा पॉइंट्सचे विश्लेषण करतात, त्यामुळे गुंतवणूक करताना एखाद्या रोबो अडव्हायजरीतही नोंदणी करण्यावर विचार करायला हवा.

तुमचे ‘भविष्य’ आणि ‘पर्याय’ माहित करून घ्या

व्यापारात प्रवेश करताना मार्केटविषयी शक्य तेवढ्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. उपलब्ध असलेले सर्व पर्याय तुम्हाला माहिती हवेत. ट्रेडिंग म्हणजे मार्केटमधील किंमतींना खरेदी आणि विक्री करणे एवढेच आहे असा तुमचा विचार असेल तर यात अजूनही बरेच पैलू असतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. मार्जिन ट्रेडिंगद्वारे न परवडणारे अधिक समभागही विकत घेता येतात. यालाच आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतो. तथापि, डेरिव्हेटिव्हजचा विचार केला जातो तेव्हा यात उडी घेण्यापूर्वी याचे फायदे-तोटे समजून घेणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने येणा-या जोखीमीही अचानक वाढतात.

खबरदारीने जोखीम पत्करा आणि हुशारीने पैसा कमवा

या संदर्भात एक वाक्य अगदी स्पष्ट आहे. तुम्ही जे गमावू शकता, त्याचाच व्यापार करा. याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही पैसे गमावणारच. भविष्यातील बचत किंवा इतर कोणत्या कर्तव्यासाठी ठेवलेल्या पैशांतून ही रक्कम घेतली नसेल तर ठराविक आवश्यक जोखीम पत्करण्यास तुम्ही सक्षम आहात. तसेच ट्रेडर्सनी विशेषत: डे ट्रेडिंगमध्ये अनावश्यक जोखीम पत्करण्याच्या थरारास बळी पडू नये. तुम्ही सर्व ट्रेडसमध्ये पराभतू होत असाल, जे की या व्यवसायातील सत्य आहे. तरीही आपले किमान भांडवल वाचवण्याचा आणि ट्रेडिंग सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतच राहिले पाहिजे.

शिस्त राखा आणि स्टॉप लॉसचा वापर करा

एखादी व्यक्ती गुंतवणुकीत प्रगती करु लागते आणि तिचे यातील अंतर्ज्ञान वाढीस लागते. तेव्हा एक क्षण असाही येतो, जेव्हा पैसा कमावण्यासाठी ट्रेडिंग आणि आपले अंदाज योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी ट्रेडिंग यातल्या सीमा धुसर होतात. ट्रेडर्सना ट्रेडिंगमार्फत फक्त आपले ज्ञान पडताळून पहायचे असते, तेव्हा त्यांच्या गुंतवणुकीच्या करिअरची उतरती कळा सुरू झाली, असे समजावे. यासंदर्भाने ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉसचा वापर करणे शिस्तशीर ठरते. ही समर्थन पातळीच्या अगदी खालची ट्रेडिंगची किंमत असते (या मूल्यापासून स्टॉक त्याच्या स्तरावरून घसरतो). एखाद्या शेअरचे मूल्य ‘स्टॉप लॉस’ च्या मर्यादेपर्यंत पोहोचले तर ते सर्व शेअर्स विकले जातील. जेणेकरून आपल्याला जास्त नुकसान होणार नाही. अखेरीस, एवढे लक्षात ठेवावे की, ट्रेडिंगमध्ये उच्चप्रतीची रणनिती आवश्यक असते. उपरोक्त मार्गदर्शनानुसार कुणीही आपली रणनिती विकसित करु शकते तसेच ती अधिक मजबूत करू शकते. एका ट्रेडरचे अंतिम ध्येय हे पैसा कमावणे आणि कमीत कमी नुकसान होऊ देणे, हे असले पाहिजे. जेव्हा बाजार जेव्हा उच्चांकावर असेल तेव्हा धोरणात्मक पद्धतीने विचार करत त्याला सामोरे गेले पाहिजे. जेणेकरून आपण दीर्घावधीसाठी बाजारातील परिवर्तनांमध्येही टिकून राहू शकू.

 493 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.