…देवाक काळजी रे !

टिटवाळ्याच्या महागणपतीचा आदिवासी पाडयांना मदतीचा हात

टिटवाळा : देशात सर्वत्र कोरोनाविरुद्ध निकराची लढाई लढली जात आहे. याचा एक भाग म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या लॉकडाउनच सर्वात मोठा फटका हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात या लोकांना अनेकांनी मदत करत त्यांना एकटे पडू दिले नाही. यात टिटवाळ्यातील महागणपतीच्या श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा ट्रस्टचाही समावेश आहे. ट्रस्टतर्फे नुकतेच टिटवाळापरिसरातील आदिवासीपाड्यावर सहा दिवस पुरेल इतका शिधा सुमारे १५०० कुटूंबाना देण्यात आला. तांदूळ, विविध डाळी,मसाले आणि बिस्किट्स चा समावेश असलेले शिधा पाकिटे गणेश वाडी, गणेश विद्यालय कडील वाडी , म्हसकल गाव कातकरी वाडी स्वप्न नगरी येथील कातकरी वाडी , घोडा खेड वाडी , व त्या बाजूची दोन गाव, ठाकूर पाडा , वासुंदरी , उतणे गाव उताणे पाडे आदिवासी , टिटवाळा येथील वरघडे चाल व अन्य चाळीत थर्वणी जवळ विशाल तरे यांनी कळवली लिस्ट आपल्या गावातील वाघमारे आली व जावई पाडा येथील नागरिकांना देण्यात आली.स्थानिक नगरसेवक संतोष तरे यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त योगेश जोशी. मोहन जोशी, सोहम जोशी, ईशान जोशी, ओमकार जोशी, महागणपती मंदिरातील पुजारी, कर्मचाऱ्यासह टिटवाळ्यातील काही गावकरी मदत वाटप करण्यात सहभागी झाले होते.

 589 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.